Thursday 17 November 2011

एक आभास प्रेमाचा ...

आजचा सुर्य थोडा चंद्रा सारखा झाला होता ,
एरवी प्रकाशाने तेजोमय असलेला ,
आज चंद्रासारखा शितलमय झाला होता ...
आज त्याच्याही मनावर  ढगांचा पडदा पडला होता,
आज तोही नेहमी पेक्षा खूप वेगळा झाला होता ,
आज त्याचही मन भरून आल होतं ,
पण एका क्षणातच कळल कि तो माझा भास होता ..,
मनाच्या खिडकीच्या काचेतून तो आज मला वेगळाच वाटला होता ..
पण जेव्हा त्या मनाच्या खिडकीची काच तुटली ....
सगळा काही एका क्षणात डोळ्यासमोर आलं ..
तो फक्त एक भास होता ..
एक भास ..
एक आभास प्रेमाचा ...

प्रियमोगारा .....