Saturday 25 May 2013

मला त्याने विचारल ..   कि का लिहतेस कविता ?
मी म्हणाले लिहायच अस काही कारण नाही .. अश्याच कधी कधी सुचतात ..

तो म्हणाला " कारण नसतच पण  आपल्याला जे वाटत , आपण जे पाहतो .. काही स्वप्न असतात..  काही कल्पना असतात त्याच मांडत असतो न आपण .. एक वेगळा जग असतं ..
तस तुझं नेमक काय … कशासाठी लिहतेस कुणासाठी लिहतेस ..
स्वप्नातल्या राजकुमारासाठी कि अंगणातल्या पारिजातकासाठी .. ??

मी म्हणाले " मी आपली शब्दांची बीजं स्वप्नांच्या जमिनीवर पेरतेय .. कधी ती बीजं उमलतात फुलतात अन कधी त्यांची सुंदर  बागेप्रमाणे  कविता होते कळतच नाही ..

मी लिहिते त्या प्रत्येक भावनेसाठी , त्या उत्कंठ प्रेमासाठी , त्या जीवघेण्या वेदनेसाठी …
त्या पारिजातकासाठी अन त्या स्वप्नातल्या राजकुमारासाठीही .. माझ्या शब्दात , कवितेत  प्रत्येकासाठी अगदी प्रत्येकासाठी जागा आहे ..

तो म्हणाला "पण तुला सुचतात कश्या ग… ?"

मन शांत असलं , बाहेर चांदणं पसरलं की शब्द भावनांवरती आपोआप कब्जा करतात ..
आणि मग खेळ सुरु  होतो शब्दांचा ..  कधी कधी माझ्याही नकळत …

तो म्हणाला " software engineer  आणि शब्दांशी खेळतेस …? not bad

" मी नाही तेच शब्द खेळतात माझ्या भावनांशी ..  नको म्हटलं तरी शब्दांत मांडू पाहतात

तो म्हणाला " मग मांडत जा की .. शब्द छान  मैत्री  निभावतात…

मी म्हणाले " पण मांडू तर कोणासमोर … ?
कोऱ्या कागदावर… 
त्याचा काय उपयोग ..  हां तेही आहे म्हणा उपयोगासाठी  लिहीतच नाही आपण ..  आणि लिहूही नये ..

बोलता बोलता मी त्याला विचारल "सगळ्याच कवींचा बघण्याचा  दृष्टीकोन  खूप वेगळा असतो …  तर सगळेच कवी प्रेमात पडलेले असतात का रे ..? सगळ्याच कवींच वेदनेशी अस काय नात असतं कि त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्दातून ते ओझरत असतं … आता मीना कुमारीचीच  गझल घे ना

ये रात .. ये तनहाई
ये  दिल के धडकने कि आवाज
ये सन्नाटा .. ये डुबते तारोन कि
खामोश गझालख्वानी...

किती किती दर्द आहे त्यात ..

तो  हसला अन म्हणाला "नाही माहित … हा पण कवितेच्या प्रेमात नक्कीच असतात … त्यांना माहित असतं फक्त  निखळ जगणं ..

प्रियमोगरा …