Tuesday 28 October 2014

रद्दीवाला ..

असा कोणी रद्दीवाला आहे का .. ? ज्याच्याकडे विचार रद्दीवाला देता येतील … 
असा रद्दीला देण्यासारखा विचार काल सहजच मनात आला …. 
धूळ खात पडलेल्या काही नकोश्या आठवणी .... 
आणि नव्या आठवणींसाठी ठेवलेली कोरीच राहिलेली आठवणींची वही …
विखुरलेल्या विचारांचे मळकटलेले चुरगळलेले कागद अस्ता व्यस्त पसरलेले …. ती सोनेरी झालर असलेली स्वप्नांची वही 
सगळच देवून टाकाव का रद्दीवाल्याला .. ?
आणि मग असा रद्दीला टाकण्यासारखा विचार त्या हयात नसलेल्या राद्दीवाल्याला शोधू लागला .....
 
 
 प्रियमोगरा .....
 

Wednesday 20 August 2014

माझ्यातली मी पहिल्यांदाच कागदावर उतरले ...


"I know I am something because god doesn't create garbage."
मी माझीच … स्वतःच आयुष्य अगदी भरभरून जगणारी … (माझ्या लेखी )
कधी रागीट … कधी जरा जास्तच फटकळ…  कधी बावळट … कधी भावुक
कधी स्वतःमध्येच हरवणारी … कधी स्वप्नांच्या बगीच्यात बागडणारी …
कधी सत्याला सामोर जाऊन परिस्थितीशी लढणारी …

मी… अगदी माझीच …(कदाचित अजून त्याची झाले नाही म्हणून  ;) ) मी… अगदी माझीच …
तशी फारशी  सुंदर वगैरे नाही … सावळा रंग , मध्यम बांधा …
अगदी एवेरेज … इतर मुलींसारखी एवेरेज असलेली मी आणि माझी स्वप्नही …
खूप काळ लोटला खूप वाटचाल झाली …
ह्या काळात आयुष्यात खूप कठीण वळणं (sharp turns)येऊन गेले … पण माझ्या आयुष्याच्या गाडीचा अपघात नाही झाला … हां … गाडीचं steering थोडा इकडे तिकडे झालं ;) … पण गाडी परत रुळावर लागली … कदाचित इतर कोणासाठी एवढं काही नसेलहि हे… पण  माझ्यासाठी खूप काही आहे …होतं …


मी बदलले ते त्या वळणामुळेच ……

शब्दांशी .. निसर्गाशी कधी जवळीक होत गेली कळलंच नाही …
स्वप्नांच्या अंगणातल्या पारिजातकाच्या , गुलमोहराच्या , बहवा च्या कधी प्रेमात पडले कळलच नाही … स्वप्नातलं अंगण म्हणतेय कारण  हल्ली ते दिसतंच नाही … Modern झालेले बिचारे पारिजातक , गुलमोहर चुकून एखाद्या बिल्डिंग किंवा अपार्टमेंटच्या खाली खोट्या रुबाबात उभे असलेले दिसतात … म्हणून स्वप्नातलं अंगण …

लहानपणी घाबरणारी मी कडाडणाऱ्या विजांना , कोसळणाऱ्या पावसाला ……
आता माझा मोर होऊन गेलाय . मोर म्हणजे काही अगदीच पावसात जाऊन भिजण्याइतपत पिसारा नाही फुलला माझा …  पण तोही फुलेल एक दिवस …… आणि मी नाचेन पावसात … अगदी मोर होऊन …ते थेंब त्यांचा स्पर्श अंगावर झेलत बरसणाऱ्या पावसात अगदी मनसोक्त …
आता कसं झालाय ना  माझं … एकदा विजा कडाडायला लागल्या कि कस मस्त वाटायला लागत …  विजेच्या प्रकाशावरून  आता किती मोठा आवाज येईल याचा अंदाज लावणारी मी … किंवा ह्याहीपेक्षा मोटा आवाज … ह्याही पेक्षा मोठी कडाडून पडावी वीज अशी वाटणारी मी …

मी जसजशी  बदलत गेले स्वतःला ओळखत गेले … लिहायची आवड निर्माण झाली … आणि त्याहून जास्त वाचनाची … हे सगळं घडताना काहींची सोबत सुटली …  तर काही जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रिणींची सोबतही मिळाली …

Photography चीही आवड आणि प्रत्येक गोष्टीकडे माझा बघण्याचा दृष्टीकोनही ह्याच सगळ्या प्रोसेस मध्ये बदलला … निसर्ग आणि प्रत्येक गोष्ट जास्त आवडू लागली …
प्रत्येक वेळी नजर फक्त काही चांगलं दिसेल का … सृष्टीच सौंदर्य दिसेल का हेच शोधू लागली …
आणि जस जस  दिसू लागलं तसं तसं माझ्या कॅमेरा सोबत माझ्या मनात त्याच्या प्रती छाप ठेवून जाऊ लागल्या …
 
अजून बरीच वाटचाल आहे …बराच संघर्ष आहे … आणि याच संघर्षातून स्वतःच्या अस्तित्वाला  मला पैलू पाडायचे आहेत . माझ्या अस्तित्वाला जगायच आहे …
"आयुष्याच्या कडेला अस्तित्वाच्या लढ्याला जगते मी माझ्या झगमगत्या या नक्षत्राला "

प्रियमोगरा ...

Thursday 31 July 2014

तू दिलेला गुलाब, तू दिलेल्या वहीत,
  तू दिलेल्या आठवणींन सोबत अजूनही तसाच आहे….
तु दिलेलं प्रेम , तू दिलेलं हसु ,
 तू दिलेल्या क्षणांन सोबत अजूनही तसच आहे
तू दिलेली नांव , तू दिलेली छत्री ,
 तू दिलेल्या पावसा सोबत अजूनही तशीच आहे
तू दिलेलं सगळं , सगळं काही आहे
 तू दिलेल्या तुझ्या सोबत फक्त माझीच मी नाहीये ….

प्रियमोगरा …

शब्दांशी पाठशिवणी खेळणं अन
खरेपणाच्या दुनियेत (so called practical)स्वप्नांना कुरवाळण
हल्ली जमत नाही मला ….


वेदनेशी एकरूप होणं अन
गळत्या पानाला तन्मयतेन बघणं
हल्ली जमत नाही मला …

तुझ्यात मला अन
माझ्यात तुला बघणं
हल्ली जमत नाही मला ….

प्रियमोगरा …