Wednesday 26 June 2013

त्याच माझ जुळणं कधीच शक्य नाही
हां त्याचे माझे विचार एक असतील ,स्वभाव एक सारखा असेल

पण एक वाट सोबतीनं चालणं शक्यच नाही …

आजवर किती बर बोललो असू आम्ही
कितीबर ?
चार दोन वाक्य ..
दहाबारा ओळी ..
शेकडो शब्द ..
कदाचित बोललो असू हजारो अक्षर …
लाखो स्वल्पविराम .. अल्पविराम … उद्गारचिन्ह

पण हजारो लांखो शब्दांमधला एकही शब्द मनाचा मनाजवळ पोहोचू नये..??

एकंदरच
जे बोलत आलो आजवर
जी काही थोडीफार सोबत होती
ती फक्त सोबतच राहिली , तो कधीही सहवास नाही झाला ... हवाहवासा
ते शब्द फक्त  शब्दच राहिले ,शब्दांच्या कळ्या भावनांमध्ये कधी  उमलल्याच नाही
मी त्याला
, तो मला कधी समजलाच   नाही

म्हणून म्हणतेय ,
त्याच माझ जुळणं कधीच शक्य नाही
कोणीही कितीही प्रयत्न केले तरी ..
निदान ह्या जन्मी तरी नाहीच नाही ..
मी त्याची तो माझा होणं कधीच शक्य नाही


प्रियमोगरा  …

Saturday 25 May 2013

मला त्याने विचारल ..   कि का लिहतेस कविता ?
मी म्हणाले लिहायच अस काही कारण नाही .. अश्याच कधी कधी सुचतात ..

तो म्हणाला " कारण नसतच पण  आपल्याला जे वाटत , आपण जे पाहतो .. काही स्वप्न असतात..  काही कल्पना असतात त्याच मांडत असतो न आपण .. एक वेगळा जग असतं ..
तस तुझं नेमक काय … कशासाठी लिहतेस कुणासाठी लिहतेस ..
स्वप्नातल्या राजकुमारासाठी कि अंगणातल्या पारिजातकासाठी .. ??

मी म्हणाले " मी आपली शब्दांची बीजं स्वप्नांच्या जमिनीवर पेरतेय .. कधी ती बीजं उमलतात फुलतात अन कधी त्यांची सुंदर  बागेप्रमाणे  कविता होते कळतच नाही ..

मी लिहिते त्या प्रत्येक भावनेसाठी , त्या उत्कंठ प्रेमासाठी , त्या जीवघेण्या वेदनेसाठी …
त्या पारिजातकासाठी अन त्या स्वप्नातल्या राजकुमारासाठीही .. माझ्या शब्दात , कवितेत  प्रत्येकासाठी अगदी प्रत्येकासाठी जागा आहे ..

तो म्हणाला "पण तुला सुचतात कश्या ग… ?"

मन शांत असलं , बाहेर चांदणं पसरलं की शब्द भावनांवरती आपोआप कब्जा करतात ..
आणि मग खेळ सुरु  होतो शब्दांचा ..  कधी कधी माझ्याही नकळत …

तो म्हणाला " software engineer  आणि शब्दांशी खेळतेस …? not bad

" मी नाही तेच शब्द खेळतात माझ्या भावनांशी ..  नको म्हटलं तरी शब्दांत मांडू पाहतात

तो म्हणाला " मग मांडत जा की .. शब्द छान  मैत्री  निभावतात…

मी म्हणाले " पण मांडू तर कोणासमोर … ?
कोऱ्या कागदावर… 
त्याचा काय उपयोग ..  हां तेही आहे म्हणा उपयोगासाठी  लिहीतच नाही आपण ..  आणि लिहूही नये ..

बोलता बोलता मी त्याला विचारल "सगळ्याच कवींचा बघण्याचा  दृष्टीकोन  खूप वेगळा असतो …  तर सगळेच कवी प्रेमात पडलेले असतात का रे ..? सगळ्याच कवींच वेदनेशी अस काय नात असतं कि त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्दातून ते ओझरत असतं … आता मीना कुमारीचीच  गझल घे ना

ये रात .. ये तनहाई
ये  दिल के धडकने कि आवाज
ये सन्नाटा .. ये डुबते तारोन कि
खामोश गझालख्वानी...

किती किती दर्द आहे त्यात ..

तो  हसला अन म्हणाला "नाही माहित … हा पण कवितेच्या प्रेमात नक्कीच असतात … त्यांना माहित असतं फक्त  निखळ जगणं ..

प्रियमोगरा …

Friday 22 March 2013

वाटा  बदलल्या ,
दिशा  बदलल्या
येणा जाणाऱ्यांच्या नजरेत आल्या ….
त्यालाही  होते ठावूक त्याचे..  दिशा बदलणे …
मलाही होत्या ठावूक त्याच्या वाटा सगळ्या … 

त्याचे माझे वाट चुकवणे
कधी चुकवणे
नजरेतले खाणा खुणावे ..

त्याचे माझे होते काय वेगळे
होते सगळे खोटे बहाणे .. 


प्रियमोगरा….

Wednesday 6 March 2013

एवढा हिशोब ठेवणारा तु ...
पण हे रे  कस विसरलास ... 
माझ्याकडून फक्त घेत राहिलास .... 
पण देण …देणं कधी कळलंच  नाही  तुला ..
मी आपली प्रत्येक वेळी लाट होऊन भेटत राहिले तुला....
पण तू .. तू तर किनारा ना रे .. तुलाही तुझा खूप अभिमान ..
तुझ्याकडे धावणाऱ्या असंख्य लाटा … त्यातलीच एक मी होते ……
मलाही तू तुझ्या किनाऱ्यापासून दूर केलंस … आणि तु ..  तू फक्त एका खडकासारखा स्तब्ध ..
तू प्रत्येक वेळी मागे परतून लावलस तरी .. आस नाही सोडली मी तुझी होण्याची ...
मी अशीच येत  जाईन लाट होऊन ... प्रत्येक वेळी तुझ्या किनाऱ्याला ..

प्रियमोगरा .....

Thursday 28 February 2013


कधीतरी येत जा …
जाता जाता मलाही घेऊन जात जा ….
 माझ्या   जाण्याने  तुझ्या येण्याने  …
 म्हणशील काय फरक पडतो … 

पण खर सांगु अरे …. फरक पडतोय मला …
हे वाळवंट पावसाच्या सरीची वाट  बघतंय …
आणि तिकडे ते … ते पाऊस घेवून ओझरणारे ढग दुसऱ्याच दिशेने चाललेत …

प्रियमोगरा…. 

Tuesday 12 February 2013

द्यायला खूप आहे...
पण घेणारं कोणी नाही ..
म्हणून माझं देणं उतु चाललंय ....
अन घेणाऱ्याच अजूनच दूर होणं चाललंय ....


प्रियमोगरा .....

Tuesday 22 January 2013


तुझा काट  त्याचा काट ...
ती वादळ वाट ..
विजांचा तो गडगडाट ..
मनाच्या किनाऱ्याला येवून
धडकणारी ती प्रत्येक लाट ...
त्याच्या वाटेला जाऊन भेटणारी ती प्रत्येक वाट ...
ओले झालेले ते डोळ्यांचे काट ..
अन तुझी त्याची ती शेवटची भेट गाठ ...
 
प्रियमोगरा .....