Monday 10 December 2012

अंतरात आत मनात , खूप काही ठेवले मी
कधी गर्दीत एकांतात, कधी कधी हरवले मी ..

त्या उन्हात , अन चांदण्यात
प्रेमातल्या त्या अंगणात ,
कधी रडले हसले , कधी वाती परी तेवले मी ...

त्या ग्रीष्मात,  अन शिशिरात
कधी बहरले फुलले, कधी कधी कोमेजले  मी ...

एकटीच होते जरी .. तरी तुझा आभास होता
मनातल्या प्रत्येक कप्प्यात .. फक्त तूच आणि तूच होता...

प्रियमोगरा....
कागदावर भावना मांडण व्यक्त करण  किती सोपं असत नाही..
पण तीच भावना जेव्हा एखाद्या व्यक्ती समोर मांडायची झाली ना कि आमचं हे असं होतं ..
एरवी कुशीत बसणारे शब्द नेमके तेव्हा सैरा वैरा धावू लागतात ...
पकडावं म्हटल तर एकही हाती लागत नाही ....
आणि कागदावर भावना मांडताना मात्र हेच शब्द एक दुसर्याला मागे पुढे ढकलून स्वतः
त्या कवितेच यमक जुळवून पूर्ण श्रेय घेवू पाहतात ...

प्रियमोगरा ....

Tuesday 4 December 2012

आजही तू भेटल्याचा भास आहे.                
अन स्वप्नातल्या तू दिलेल्या मोगर्‍याचा वास आहे!                                                     
तुला सांगते हे असे वागणे असू नये              
मला चेहरा तुझा  दिसावा, तुला माझा का दिसू नये!


प्रियमोगरा...

Tuesday 17 April 2012

आठवणीतला पाउस
गरजून बरसणारा
ओलेचिंब करून टाकणारा.....
 

आठवणीतला पाउस
डोळ्यात पाणी आणणारा
मनात हिरवळ पसरवणारा....
 

आठवणीतला पाउस
तो मातीचा सुगंध
आणि त्यात नाचणारी मी बेधुंध.....
 

आठवणीतला पाउस
आणि पावसातली
ती ओलेचिंब मी .......


प्रियमोगरा....