त्याच माझ जुळणं कधीच शक्य नाही
हां त्याचे माझे विचार एक असतील ,स्वभाव एक सारखा असेल
पण एक वाट सोबतीनं चालणं शक्यच नाही …
आजवर किती बर बोललो असू आम्ही
कितीबर ?
चार दोन वाक्य ..
दहाबारा ओळी ..
शेकडो शब्द ..
कदाचित बोललो असू हजारो अक्षर …
लाखो स्वल्पविराम .. अल्पविराम … उद्गारचिन्ह
पण हजारो लांखो शब्दांमधला एकही शब्द मनाचा मनाजवळ पोहोचू नये..??
एकंदरच
जे बोलत आलो आजवर
जी काही थोडीफार सोबत होती
ती फक्त सोबतच राहिली , तो कधीही सहवास नाही झाला ... हवाहवासा
ते शब्द फक्त शब्दच राहिले ,शब्दांच्या कळ्या भावनांमध्ये कधी उमलल्याच नाही
मी त्याला
, तो मला कधी समजलाच नाही
म्हणून म्हणतेय ,
त्याच माझ जुळणं कधीच शक्य नाही
कोणीही कितीही प्रयत्न केले तरी ..
निदान ह्या जन्मी तरी नाहीच नाही ..
मी त्याची तो माझा होणं कधीच शक्य नाही
प्रियमोगरा …